ठाण्यात शिवसेनेच्या शाखेवरून शिंदे आणि ठाकरे गटात पु्न्हा एकदा जोरदार राडा झाल्याचं पाहायला मिळालं. ठाण्यातील शिवाईनगर येथील शिवसेना शाखेवरून दोन्ही गट आमने-सामने आले होते. दोन्ही गटाच्या समर्थकांची गर्दी पाहता पोलिसांना जमावबंदीचे आदेशही लागू करावे लागले. अखेर या हायव्होल्टेज ड्रामावर शिवसेनेचे (शिंदे गट) प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.